बेळगाव दि १७-रेल्वे ट्रक वर स्वतावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून रेल्वे खाली येऊन आत्महत्त्या केलेल्या युवतीची ओळख पटली असून ती अभियांत्रिकी शाखेची विध्यार्थिनी आहे . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार संजना चंद्रकांत अनगोळकर(२० ) राहणार पहिले फाटक टिळकवाडी बेळगाव अशी ओळख पटली आहे .
मराठा मंडळ कॉलेज इंजिनियरिंग विभगात ती शिकत असल्याची माहिती देखील समोर येत आहे . घटना स्थळावर पडलेली कोलेज बग मुळे पोलिसांनी तिची ओळख पटविली असून कोणत्या कारणाने तिने आत्महत्त्या केली असावी याबाबत पोलीस तपास करत आहेत . अंगाला शहारे आणून देणारी घटना असून घटना स्थळी बघ्यांची गर्दी झाली होती .