शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कर्नाटक सरकारने नो क्रॉप भुमी असा उल्लेख रद्द करावा कृषी मालास योग्य हमी भाव मिळणे आणि 24 तास थ्री फिज वीजपुरवठा करणे आदी मागण्यांच्या पुर्तते साठी शेतकरी वर्गात जन जागृती करण्यासाठी बेळगुंदी येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी दिली.बेळगाव live शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत बी बियांना ना सबसी डी मिळावी शेत वाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करून तलाव खुदाई करावी ही मागणी शासना कडे करणार आहोत .
तालुक्यात जो कष्टकरी शेतकरी राहतो त्याला त्याच्या अधिकाराच ज्ञान मिळावं माहिती मिळावी हा उद्देशय ठेऊन मेळावा आयोजित केला असून याचा लाभ शेतकऱ्यानी घ्यावा असं देखील सावंत म्हणाले. या मेळाव्यास महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांचं मार्गदर्शन मिळणार असून यावेळी बेळगाव ए पी एम सी अध्यक्ष निंगप्पा जाधव यांचा सत्कार केला जाणार आहे.यावेळी वाय बी चौगुले, म्हात्रु झंग्रूचे, शिवाजी सुंठकर, मनोज पावशे,अड एन आर लातूर, सुनील अष्टेकर, शिवाजी शिंदे ,यल्लप्पा बेळगावकर आदी उपस्थित राहणार आहेत