बेळगाव दि ९ –शेतकऱ्यांची कर्जे माफ करा या मागणी साठी बेळगाव भाजप महा नगरच्या वतीने आंदोलन करण्यात आल. कर्नाटक प्रदेश भाजपच्या वतीने राज्य स्तरीय आंदोलन करण्यात आल त्या अनुषंगाने बेळगाव महा नगर भाजप वतीन आंदोलन करण्यात आलय .
राज्यात भीषण दुष्काळ असून शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर्षीच्या बजेट मध्ये शेतकरी कर्ज माफ प्रावधान करा अशी मागणी यावेळी निवेदना द्वारे करण्यात आली आहे . यावेळी चन्नमा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरी काढून राज्य सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. नूतन भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी यांनी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्या पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वात कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. राज्य सरकार केंद्रावर दुष्काळी निवारण करण्याची जबाबदारी ढकलून यातून मुक्त होण्याचा विचारात आहे राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी अशी मागणी राजेंद्र हरकुनी यांनी केली.यावेळी भाजप नेते शंकर गौडा पाटील, किरण जाधव, अभय पाटील आदी उपस्थित होते