Thursday, May 2, 2024

/

कसा होता महापौरांचा पहिला दिवस

 belgaum

बेळगाव दि २ : महापौर संज्योत बांदेकर यांनी बेळगाव नगरीच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर पहिला दिवस कसा गेला हे जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्ह ने त्यांची भेट घेतली त्यांच्या गोंधळी गल्लीतील घरी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी महापौर निवडीचे वृत्त सर्व दूर महाराष्ट्रात पसरल्याने महाराष्टार्तील विविध भागातून आपल्याला अभिनंदनांचे फोन आले महाराष्ट्रातील सर्वच आघाडीच्या वृत्तपत्रांनी, वृत्त वाहिन्यांनी बेळगावच्या महापौर निवडीच्या बातमीला खास प्राधान्य दिल्याने कोट्यावधी लोकांच्या पर्यंत माझ्या महापौर निवडीची बातमी पोचली आणि त्यामुळे महाराष्ट्रातून तसेच देशातील विविध भागातून सतत दिवसभर मला अभिनंदनाचे फोन येतच आहेत अस त्या म्हणाल्या. माझे माहेर रायगड जिल्ह्यातील महाड असल्याने महाराष्ट्राची कन्या सीमाभागातील एका मोठ्या शहराच महापौर पद भूषवते याचा आंनद महाड मधील माझ्या माहेर वासीय,माझ्या कामेसो पाथयर्व कन्या महा विद्यालय महाड शाळेचे शिक्षक आणि माझ्या मैत्रिणी ना झाला आहे. या सह सातारा कोल्हपुर सोलापूर येथून  परिट समाजाच्या अध्यक्षांनी मला महाराष्ट्रातून फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत अस देखील म्हणाल्या .

 

sanjyot bandekar 1अशी झाली दिवसाची सुरुवात

 belgaum

महापौर निवडणुकीत द रियल किंग ची भूमिका बजावलेले दक्षिणचे आमदार संभाजी पाटील यांची त्यांच्या निवास स्थानी जाऊन भेट घेतली आणि कामकाज असे करावे याबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचाआशीर्वाद घेतला या नंतर घरी आल्यावर मराठी अस्मितेवर नेहमी कट्टर असणारे बापट गल्ली येथील कालिका देवी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माझा सत्कार केला . पहिल्या दिवशी काय होणार याची जशी उत्सुकता होती तस दडपण देखील माझ्यावर होत त्याप्रमाणे  सकाळी अकरा वाजता कार्यालयात गेल्यावर पहिला पी ए सोबत चर्चा केली कामकाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्या नंतर माजी महापौर सरिता पाटील किरण सायनाक यांच्या सोबत पुढील कामकाज बाबत चर्चा केली.पालक मंत्री रमेश जारकीहोळी शनिवारी विकास आढावा बैठक घेणार आहेत त्या बैठकीच्या तयारी साठी उद्या सर्व नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे या बैठकीने माझ्या कामकाजाची खरी सुरवात होणार आहे.महापौर म्हणून पहिला दिवस हा फक्त निव्वळ औपचारिकतेचा होता अस त्या आवर्जून म्हणाल्या . महापौर कक्षात माजी महापौर संघटना, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी आणि मराठी विद्या निकेतन शाळेच्या कर्मचारी वर्गाने कार्यालयात येऊन सत्कार केला याशिवाय सायंकाळी वैश्यवाणी समाजाच्या वतीने देखील  सत्कार करण्यात आला .

अस करणार आहे काम

शिक्षिका गृहिणी ते महापौर पदाची जबाबदारी अगदी जबाबदारीने सांभाळणार असल्याच ठासून सांगत महापौरांनी भविष्यातील कामा बद्दल सांगितलं . दर रोज सकाळी एका वार्डला मी भेट देणार असून शहरातील ५८ वार्ड हे माझेच आहेत अस काम करण्याचा प्रयत्न करणार आहे . प्रत्येक नगरसेवकाला विश्वासात घेऊन विचारून घेऊन समस्या सोडविण्यासाठी काम करणार आहे. स्मार्ट सिटी बनवणे माझे ध्येय असणार आहे शहर वासियांना जास्तीत जास्त उत्तम नागरिक सुविधा मिळतील शहर कस सुंदर कस बनेल .पाणी गटार,रस्ते पथदीप स्वच्छतेच्या समस्या उणीव होऊ न देता जनतेला कोणताच त्रास होणार नाही  देशात स्मार्ट शहर कस बनल जाईल यासाठी वर्ष भर माझे प्रामाणिक प्रयत्न असतील .

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.