बेळगाव दि 23-के आय डी बी चे दोन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले असून ए सी बी च्या जाळ्यात अडकले आहेत. शहरातील अँटी करप्शन ब्युरो युनिट ऍक्टिव्ह झाले असून या महिन्यातील दुसरी कारवाई आहे.
के आय डी बी विभागीय अधिकारी प्रकाश कुमार आणि केस वर्कर बसु पुजार या दोघाना लाच घेतेवेळी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ए सी बी पथकाचे एस पी,डी एस पी जे रघु, निरीक्षक विशवनाथ क ब्बूर आदी सहकाऱ्यांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे. 18 हजार रुपयांची लाच मागीतल्याची माहिती मिळताच धाड टाकण्यात आली आहे. इम्तियाज ताशीलदार नामक व्यक्तीस सेल डिल साठी 18 हजार लाच मागण्यात आलो होती.