बेळगाव दि 9- गुरुवार पासून शहरासह जिल्ह्यात पी यु सी द्वितीय वर्षाच्या परीक्षा सुरु झाली आहे तर दुसरी कडे पेपर मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांनी मूल्यांकन समस्या सोडवण्याची मागणी करत दंडाला काळ्या फिती सांकेतिक आंदोलन केल.
शहरातील परिक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्योती कॉलेज आर पी डी कॉलेज सरदार पी यु सी कॉलेज सारख्या जिल्ह्यातील एकूण 77 परिक्षेच्या केन्द्रावर परीक्षा सुरु आहे. एकूण 49914 विद्यार्थी परीक्षेस बसले असून यात 28849 मुलं तर 21074 मुली आहेत यावेळेस 38880 रेग्युलर तर 8653 रिपीट तर 2381 बाहेरील विध्यार्थी आहेत.
जिल्हा प्रशासनाचे विविध खात्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जागृती दल सथापित केलं असून कॉपी वर नियंत्रण करण्यात येत आहे. सर्व 77 परीक्षा केंद्रा बाहेर 144 जमाव बंदी लागू केली आहे . परिक्षेवेळी पेपर मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांनी दंडास काळी फीत बांधून सांकेतिक आंदोलन केलं