बेळगाव दि २१ : प्रियकरा सोबत फिरायला गेलेल्या महाविध्यालयीन युवतीवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयिताना काकती पोलिसांनी अटक केली आहे . सदर युवतीवर बेळगाव सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी हॉस्पिटल ला भेट देऊन पिडीत युवतीची चौकशी करून माहिती जाणून घेतली .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सदर पिडीत युवती आपल्या प्रियकरा सोबत भूतरामहट्टी गार्डन जवळील मोठ्या पंख्यां कडे गेले असता पाच जणांनी बाजूला नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता सगळी गेल्या १५ फेब्रुवारी सायंकाळी सात च्या सुमारास ही घटना घडली होती बलात्कार करणाऱ्यांनी पंधरा मिनिटे चित्रीकरण करून पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न नराधमांनी केला होता अशी सगळी माहिती माहिती पोलिसांनी प्रियकरा कडून तपासात उघड केली आहे . त्यानंतर पिडीत युवतीने आपल्या पालकांच्या उपस्थितीत काकती पोलिसात तक्रार दाखल केली आहे . मंगळवारी सायंकाळी पर्यंत पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयितांना अटक केली आहे. सदर संशयित हे मुत्त्यानट्टी गावचे रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे . मंगळवार सायंकाळी पर्यंत संशयित आरोपींची चौकशी सुरूच होती .