बेळगाव दि २१ : शहरातील कॅम्प भागात शाळांची संख्या पाहता छावणी सीमा परिषदेच्या सीमेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय कॅटोमेंट मासिक बैठकीत घेण्यात आलाय . बेळगावातील कॅम्प भागात सेंट पाल सेंट झेवियर्स मेरीज जोसेफ आणि केंद्रीय विद्यालय सारख्या अनेक शाळा असल्याने अपघात होण्याचा संभव असतो त्यामुळे या भागात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे .
यावेळी बैठकीत बोलताना छावणी सीमा परिषदेचे सी ई ओ हर्षा ई एच यांनी कॅम्प भागात प्रवेश करणाऱ्या वाहना वर नजर ठेऊ अस आश्वासन दिल . बांधकाम परवानगी साठी लागणाऱ्या नियमावली ला बैठकीत सादर केल्यावर सदस्यांनी याला विरोध करत नियमावली बनवताना सदस्यांना विश्वासात का घेतल्याचा आरोप केला. अधिकारी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला . लीज संपलेल्या दुकानांना मुदत वाढून देणे वारसा प्रकरणे लवकर सोडवणे, स्वच्छता राखणे तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे आदी मागण्या सदस्यांनी बैठकीवेळी केल्या . छावणी सीमा परिषद अध्यक्ष ब्रेगेडीयर प्रवीण शिंदे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते .