बेळगाव दि २२: मराठीतला सुपर हिट चित्रपट “पिंजरा” सिल्वर जुबली करणारे बेळगावातील एक जुने चित्रपटगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “प्रकाश” सिनेमाघराचे आधुनिकी करण केले जात आहे.अत्याधुनिक साऊंड सिस्टम, पुश बक चेयर, नवनवीन तंत्रज्ञाना सह या थियेटरच मल्टीप्लेक्स च्या धर्ती वर आधुनिकी करन केल जात आहे .
ग्लोब सिनेमा चे संचालक महेश कुगजी हे प्रकाश थियेटर च आधुनिकी करणाच काम हाती घेतल आहे . कर्नाटकातील दुसरी आणि बेळगावात पहिल्यांदाच ४ के सिस्टम हाय लेवल प्रोजेक्टर या सिनेमा घरात टाकलेला असून यामुळे हाय रेजुलूशन यु एच डी अल्ट्रा हेड पिक्चर क्वालिटी बेळगाव करांना बघायला मिळणार आहे त्यामुळे एकदा जर का प्रकाश सिनेमा घरात चित्रपट पहिला तर दुसऱ्यांदा प्रेक्षक नक्कीच या सिनेमा घराकडे घराकडे वळतील असा दावा संचालक महेश कुगजी यानी केलाय . अत्याधुनिक शौचालये आणि स्क्रीन फायर प्रोजेक्टर देखील बसविण्यात आला असून आगामी ३ मार्च किंवा १० मार्च याच उद्घाटन करणार असल्याचे देखील कुगजी म्हणाले.
हिंदी तले साजन, घायल,राजाबाबू आणि कन्नड मधील चंद्र चकोरी आणि तेलगु चा आर्या असे चित्रपट प्रकाश सिनेमा घरात सिल्वर जुबली झाले आहेत .आजच्या मल्टीप्लेक्स च्या युगात प्रकाश सिनेमाघर बेळगावातील आयनॉक्स आणि बिग सिनेमा बरोबर सिने रसिकांना उत्तम सेवा द्यायला सज्ज होत आहे.