बेळगाव :१४ (गुरुवारी ता, 16) रोजी निघणाऱ्या सकल मराठा क्रांती (मूक) मोर्चास रोहन कोकणे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव रोलर्स स्केटिंग च्या खेळाडूंनी एक रॅली काढून मराठा मोर्चास पाठींबा दिला.त्याचप्रमाणे जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी, गजलक्ष्मी महिला मंडळ यांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.
या मोर्चाच्या मार्गावर जायंट्स सखी व गजलक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने 5000 पाण्याची पाकिटे वाटण्यात येणार आहेत, जायंट्स मेन च्या वतीने स्वच्छतेचे काम करणार आहत,
बातमी सौजन्य : महादेव पाटील बेळगाव