बेळगाव दि 1 हिंडलगा जेलमध्ये असणाऱ्या एका नामचीन गुन्हेगाराच्या सुटकेची सुपारी घेऊन आलेल्या आंतरराज्य सुपारी मारेकऱ्यांना बेळगावात पोलिसांनी अटक केली आहे .पोलिसांनी सहा शार्पशुटरना अटक केली असून त्यांच्याकडून पाच पिस्तूल ,२९ गोळ्या ,अठरा मोबाईल ,वीस सिम कार्ड ,चाकू ,मुष्टी आणि बनावट नंबर प्लेट जप्त केल्या आहेत .
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तीवर मंगळवारपासून नजर ठेवली होती . वीर मदन रेड्डी ,बंगलोर ,अविनाश जगन्नाथ मारके ,ठाणे ,मोहमद हनीफ अबूबकर दक्षिण कन्नड जिल्हा ,पुत्तुर ,अहमद सईद अब्दुल रेहमान ,घाटकोपर ,मुंबई ,अब्दुल करीम ,बेलादूर ,दक्षिण कन्नड जिल्हा आणि ताहीर हुसेन उर्फ अनुप गौडा ,बंगलोर अशी अटक करण्यात आलेल्या शार्प शूटरची नावे असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी रात्री उशिरा बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली . गुल्फाम नावाची व्यक्ती मात्र फरार झाली .
अटक केलेल्या व्यक्तींनी हिंडलगा कारागृहात वकिलाच्या हत्येप्रकरणी आरोप असलेल्या दिनकर शेट्टी याला जेलमधून बाहेर काढण्याची सुपारी घेतली होती . दिनकर शेट्टीची कारागृहातून सुटका करण्याची सुपारी शार्प शुटरना कोणी दिली याचा शोध घेत आहेत .