बेळगाव दि १० : बेळगावातील रेणुका भक्तांनी भंडारा उधळत जिल्हाधिकारी कार्यालया समोर तब्बल दोन तास अनोख्या पद्धतीन आंदोलन केल. रेणुका देवी मंदिर सौंदत्ती यल्लम्मा डोंगरात यात्रेकरूना योग्य नागरी सुविधा पुरवाव्यात अश्या मागण्यासाठी शहरातील शकडो रेणुका देवी भक्तांनी आंदोलन केल .
दरवर्षी कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यातून लाखो भाविक सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला जात असतात. यल्लम्मा डोंगरात योग्य नागरी सुविधा नसल्याने दर्शनसाठी यात्रेच्या काळात गेलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे . सौदत्ती डोंगरात पिण्याच्या पाण्याची ,मेडिकल स्वच्छता तसच राहण्याची योग्य सोय नाही.
यावर्षीच्या जत्रेत जानेवारी महिन्यात यात्रेला गेलेल्या बेळगाव शहरातील दोन भाविकांचा यल्लम्मा देवस्थान परिसरात योग्य वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झाला होता अश्या घटना भविष्यात टाळण्यासाठी राज्य सरकारने सौंदत्ती नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि मृतकांना राज्य सरकारने नुकसान भरपाई ध्यावी अशी मागणी करण्यात आली आहे . यावेळी मरगाई देवस्थान कमिटी चे सदस्या सह माजी नगरसेवक नेताजी जाधव , राम सेनेचे रमाकांत कोंडुसकर उदय सायनाक आदी उपस्थित होते .