बेळगाव दि ६ : महिलांचं आरोग्य हे फक्त शारीरिक आणि मानसिक नसून आर्थिक आणि सामाजिक देखील आहे आर्थिक आणि सामाजिक आरोग्यावर भर देण्यासाठी महिला स्वता आर्थिक रित्या सक्षम बनल पाहिजेत आणि स्वावलंबी व्हायला पाहिजेत असे मत डॉ सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केल .
बेळगावातील लोकमान्य रंग मंदिरात आयोजित महिला महोत्सवाच्या सांगता समारंभ आणि हळदी कुंकू कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या . यावेळी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर ,मराठा मंडळ शाळेच्या प्राचार्या लता पाटील आणि सुहाना मसाल्याचे व्यवस्थापक देखील उपस्थित होते .
डॉ सरनोबत पुढे म्हणाल्या की सगळ्या महिला आपापल्या घरातील काम आटोपून व्यवसाय करतात नोकरी करतात आणि आपल्या कला गुणांना देखील वाव देतात आणि स्मार्ट बनतात त्यामुळे बेळगाव शहर जे स्मार्ट होणार आहे त्यामुळे आजच्या युगात महिलांनी देखील स्मार्ट होणे गरजेचे आहे असे सांगत. आरोग्य संबधी आहार कसा असावा शरीर स्वास्थ कस ठेवाव या संदर्भात महिलाना मार्गदर्शन केल . महिला आघाडीच्या वतीने दोन हजार महिलांना एकाच व्यासपीठावर एकत्रितकेल्याने महिला आघाडीच अभिनदन केल . यावेळी महील आघडीच्या वतीने आयोजित विविध खेळ ,पाक कला आणि इतर स्पर्धात विजेत्या महिलांना पारितोषिक देण्यात आली .