बेळगाव दि १९: बेळगावात कर्नाटक सरकारने साजरी केलेल्या सरकारी पातळी वरील शिव जयंती मिरवणुकीचा फज्जा उडाला असून शिव कालीन इतिहास चित्ररथ मिरवणुकीच्या माध्यमातून दाखविण्या एवजी कन्नड भाषेतील कला पथके दाखवून शिव जयंती मिरवणुकीवर वर कानडी छाप आहे असे भासविण्याचा केवीलवाना प्रयत्न केला त्यामुळे स्थानिक मराठी भाषिकांनी या मिरवणुकीकडे पाठ फिरविली होती
वैशाख शुद्ध द्वितीयेस बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव जयंती मिरवणुकीला एक ऐतिहासिक महत्व आहे . गेल्या चार वर्षांपासून कर्नाटकी सरकार शिव जयंती साजरी करताना मिरवणुकीत शिवरायांचा इतिहास दाखवण्या एवजी कानडी कला पथक सामील करून बेळगाव शहरावर कानडी प्रभाव असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे .पुढील वर्षी तरी शिवाजी महाराजांचा इतिहास असलेली चित्र रथ दाखवावेत अशी मागणी मराठी भाशिकातून व्यक्त होत आहे
या सरकारी शिव जयंतीच्या शिवाजी उद्यान येथील कार्यक्रमास खासदार सुरेश अंगडी आमदार संभाजी पाटील,आमदार संजय पाटील,महापौर सरिता पाटील,उपमहापौर संजय शिंदे , पालिका आयुक्त एम शशिधर कुरेर, महा पालिका विरोधी पक्ष नेते रमेश सोनटक्की यांच्या सह काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शिवाजी उद्यानातून शहरभर कला पथक फिरविण्यात आली