Monday, December 23, 2024

/

भडकाऊ भाषण आढळ्यास संयोजाकावर कारवाई : जी राधिका

 belgaum

बेळगाव दि १७: मराठी मोर्चात भडकाऊ भाषण आढळ्यास संयोजाकावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे . कानडी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राधिका यांनी ही माहिती दिली आहे . मराठी मोर्चात सहभागी झालेल्या मुलींच्या भाषणाची सी डी आम्ही तपासत असून जर का यात भडकाऊ भाषण आढळली तर संयोजाकावर कारवाई करू अस राधिका म्हणाल्या.

मराठी मोर्चा यशस्वी झाल्याचा पुळका अनेक राष्ट्रीय पक्षातील नेत्यांना झालाय तसा कानडी पत्रकारांना देखील झाल्याच दिसून येत आहे .शांततेत झालेल्या मूक मोर्चात रणरागिणी केलेल्या भाषणाची  सी डी चा तपास करण्याचा अट्टहास कानडी पत्रकार करत आहेत. भारतीय राज्य घटनेने मत स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आपण कुठेही आपल मत नोंदवू शकतो मात्र मोर्चाच यश मराठी भाषिकांची एकजूट पाहून प्रशासन जाणून बुजून मराठी नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे .

संयोजकांना तारीख पे तारीख

मराठा मोर्चा च्या दहा संयोजाकावर कलम १०७ आणि १०८ अनुसार दोन भाषिकात तेढ निर्माण करणे  असा आरोप करत जर केलेल्या नोटिशीची सुनावणी शुक्रवारी डी सी पी जी राधिका यांच्या समोर झाली यावेळी संयोजकांना पुन्हा  गुरुवार २३ फेब्रुवारी हि पुढील तारीख देण्यात आली आहे .

girl speeches maratha morcha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.