Saturday, September 7, 2024

/

सीमा चळवळीची नवी पहाट……

 belgaum

कुणी कल्पना देखील केली नव्हती बेळगावातील मराठी मोर्चा भूतो न भविष्यती असा यशस्वी होईल तसं पाहिलं तर बेळगावातील मराठ्यांना आरक्षणा पेक्षा सीमा वादाचा मुद्दा नक्कीच मोठा वाटतो याची प्रचीती गेल्या काही दिवसात बेळगावकरांना आली असेलच.महाराष्ट्रातील मराठा मोर्चा बेळगावात येऊन तो मराठी झाला त्यामुळे मराठी अस्मितेशी लढणारे अनेक समाज, अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता.

प्रशांसनाची दडपशाही झुगारून मोर्चा इतका यशस्वी करणे सोपे नव्हते यात भाषिक अस्मिता आणि भावना जोडली असल्याने हे यश मिळाल आहे . बेळगाव लढ्यात युवकांचा वाढता प्रभाव स्थानिक प्रसारमाध्यमांचा पाठिंबा आणि सोशल मिडिया वर जनजागृती या सगळ्या गोष्टी या मिळालेल्या यशाच गमक आहेत. कोल्हापूर महाराष्ट्रात मोर्चे यशस्वी करण्यात तिथल्या स्थानिक प्रशासनाने खूप मदत केलेली दिसते मोर्चा साठी सरकारी यंत्रणा राबणे शहरातील रस्ते तयार होणे अश्या अनेक गोष्टी पूरक असतात मात्र प्रशासनाच्या विरोधात पोलिसांच्या दडपशाहीत संयोजकांनी गुन्हे अंगावर घेत अत्यंत प्रतिकूल स्थितीत हा मोर्चा यशस्वी करणे म्हणजे सीमा लढ्यात भविष्यात देखील चळवळ जोमाने उभ राहील याची लक्षण आहेत.

मोर्चा जरी सकल मराठा समाजाच्या नेतृत्वात काढला जा असला तरी पोलीस प्रशासन हा मोर्चा महाराष्ट्र एकीकरण समिती ने काढला आहे अशीच वागणूक देत होते दडपशाही चे सत्र अवलंबत होते मात्र लाखो मराठी भाषिकांनी मोर्चास हजेरी लाऊन पोलीस प्रशासनास एक सणसणीत चपराक दिली आहे.

एरव्ही बेकीने गुरफट असलेले मराठी नेते बेळगाव तालुक्यातील बऱ्याच सभातून एकत्रित दिसले ही जरी जेमेची बाजू असली तरी अजूनही यांच्यातील हेवेदावे कमी झालेले नाहीत हा मोर्चा कुणी एकट्याच्या नेतृत्वात काढला नसून समस्य सीमावासीय जनतेला याच श्रेय ध्याव लागेल.कार्यकर्ते एकत्र आहेत बेकी नेत्यामध्ये होती आणि काही प्रमाणात आजही ती आहे आंदोलन एखादी चळवळ यशस्वी झाली की पदावर डोळा ठेवणे,विधानसभेची उम्मेद्वारी  मिळवणे हे अंतिम ध्येय न ठेवता चळवळ आंदोलन आणि सुप्रीम कोर्टाच कामकाज याकडे लक्ष देण गरजेच आहे. एकीकरण समितीच्या अस्मितेचा लढा संपला म्हणणाऱ्याना मोर्चा यशस्वी होण एक चपराक आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा म्हणत होत सीमा लढ्याच्या चळवळीची नवी पहाट आहे हा बेळगावातील मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा!!!!

over bridge photo

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.