बेळगाव दि ९ : बेळगाव शहरातील महिलांच्या रक्षणासाठी खास चन्नमा ब्रिगेड दल तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे . जोडलेलं शहरातील महिला.पोलीस स्थानकाशी हे चन्नमा ब्रिगेड यात महिला पोलीस कॉन्स्टेबल सह अधिकार्यांचा देखील भरणा करण्यात आला आहे .
बेळगाव शहरातील शाळा कोलेजीस मधील मुलींची छेढछाढ रोखण्यासाठी तसच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविणे अश्या चोऱ्या रोखणे आणि महिला सुरक्षा ही खास जबाबदरी या ब्रिगेड कडे देण्यात आली आहे अस देखील जी राधिका यांनी स्पष्ट केल आहे . सध्या शहरात चन्नमा ब्रिगेड खास महिला पोलीस पथकाच्या गाडी फिरत असून गरज भासल्यास अजून सर्व शाळा कोलेजीस मध्ये कार्यरत असणार आहेत .