बेळगाव एक जुन्या काळापासून नावाजले गेलेले शहर. वेणूग्राम बेळगावची इतिहासात नोंद आहे. या शहराला उज्वल परंपरा आहे, अठरापगड जातींनी सामावलेले हे गाव गुरुवारी आजवरच्या इतिहासातील एक सर्वात मोठ्या क्रांतीचे साक्षीदार ठरणार आहे. निमित्त आहे सकल मराठा आणि मराठी क्रांती मूक मोर्चाचे. लाखो नागरिकांच्या साथीने आपल्या विविध मागण्यांसाठी होईल मूक हुंकार, चला तर मग एक नवा इतिहास घडवूया.
गुरुवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी उद्यांनातून मोर्चास सुरुवात होईल, वाहनांची गर्दी नाही, त्यांचा आवाज नाही. माणसेही अतिशय शांत आणि संयमी सहभागी, यामुळे एक ध्वनी आणि वायुप्रदूषण विरहित मोर्चा हे याचे स्वरूप राहील. अनेकांना चपराक देत पूर्णपणे गोंधळ विरहित क्रांती हे ध्येय साध्य केले जाणार आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, चिकोडी,निपाणी,अथणी,चंदगड,आजरा,गडहिंग्लज,कोकण,गोवा आणि इतर अनेक भागातून मराठी माणसे दाखल होणार आहेत. सीमाप्रश्न सुटावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर अनेक मागण्यांना साथ देण्याची तळमळ यात असेल.
विघ्नसंतोषिही येतील, गोंधळ माजविण्याचा प्रयत्न होईल, हटू नका, भडकू नका, शांततेला सोडू नका, बेळगावात उमटणारा लाखोंचा महापूर वाया जाऊ देऊ नका……
चला तर इतिहास घडवूया आणि त्याचे साक्षीदार होऊया