बेळगाव दि ४ : १७ फेब्रुवारी बेळगावात होणाऱ्या एक मराठा लाख मराठी मोर्चा साठी बेळगावातील लहान लहान समाज मराठा मोर्चा ला पाठिंबा ध्यायला सुरुवात झाली आहे .
शहरातील अखिल भारतीय दैवज्ञ समाजाने मराठा मोर्चास पाठिंबा दर्शविला आहे . शनिवारी दुपारी मध्यवर्ती कार्यालयात दैवज्ञ समाजाच्या २० समाज प्रमुखांच्या सह्या असलेल पाठिंब्याच पत्र संयोजका कडे सुपूर्द केल . माजी नगरसेवक दयानंद कारेकर आणि हेमंत मुतगेकर हे या वेळी उपस्थित होते. लाख मराठी साठी आता बेळगावातील छोटे छोटे समाज पाठिंबा देत असल्याने दिवसे दिवस मोर्चा शक्ती वाढतच आहे . दैवज्ञ समाजाच्या वतीने मोर्चा दिवशी मारुती गल्ली भागात चहा आणि नाष्ट्याची सोय करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आल आहे