Tuesday, April 23, 2024

/

शार्प शूटर्सना जेरबंद केलेल्या डी सी पी रेड्डी यांना कन्नड संघटनेच बक्षीस

 belgaum

amarnath reddy dcp

बेळगाव दि ४ : शार्प शुटर्सना जेरबंद करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांना कन्नड संघटनेच्या नेत्याने अडीच हजार रुपये बक्षीस दिले आहेत . गेल्या दोन दिवसापूर्वी बेळगाव पोलिसांनी शार्प शुटर्सना अटक करून बेळगाव शहरावरील संभाव्य धोका टाळला होता  त्यामुळे कन्नड संघटनेचे नेते अशोक चंदरगी यांनी पोलीस उपायुक्त(गुन्हा) यांना कन्नड संघटना कडून अडीच हजारांच बक्षीस दिल आहे .

शनिवारी सकाळी चंदरगी यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात स्वत जाऊन बक्षिसाची रोख रक्कम सुपूर्द केली . एकीकडे पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने बऱ्याच बक्षीस देणे गरजेचे असताना कानडी संघटनानी अश्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन सर्वा समोर एक आदर्श निर्माण केला आहे .  गेल्या वर्षात अमरनाथ रेड्डी यांनी बऱ्याच प्रकरणांचा छडा लावला आहे . मूर्ती लहान असून देखील आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवत रेड्डी यांच्या नेतृत्वात गड्डेकर  सारख्या  साहसी अधिकाऱ्यांच्या सोबतीने अनेक कार्य यशस्वी केली आहेत . बेळगाव शहरातील गणेश उत्सव आणि शिव जयंती उत्सवाची मिरवणूक देखील रेड्डी यांच्या नेतृत्वात शांततेत पार पडली होती या शिवाय रहदारी नियंत्रण आणि जातीय दंगली रोखण्यात रेड्डी यांनी मोलाची भूमिका बजावली होती . जिल्हा पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या नंतर बेळगाव शहरास लाभलेल्या अश्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास बेळगाव लाईव्ह चा सलाम

 belgaum

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.