बेळगाव दि १३ : बेळगावात १६ फेब्रुवारीला होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चास चेंबर ऑफ कॉमर्स च्या माजी अध्यक्षांनी पाठिंबा दिला आहे . मराठी समाला न्याय मिळवून देण्यासाठी संयोजकांनी योग्य पाऊल उचलले आहे त्यामुळे बेळगाव कर जनता मोर्चा ला मोठ यश देईल जबाबदार व्यापाऱ्यांची संस्था म्हणून आम्ही चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष या मोर्चास पाठिंबा देत आहोत अस पत्र संयोजकांना दिल आहे. चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष सतीश तेंडोलकर शेवंतीलाल शाह यावेळी उपस्थित होते .
कुडची लाठी मेळ्याचा पाठिंबा
बसवन कुडची येथील बाल शिवाजी लाठी मेळाव्याच्या वतीने देखील मोर्चास पाठिंबा देण्यात आला आहे या लाठी मेळाव्याचे जोतीबा मुतगेकर आणि कृष्णा कडेमनी यानी पाठीम्ब्याच पत्र संयोजकांना दिल .
समर्थ नगर येथील एकदंत युवक युवक मंडळाचा पाठींबा
समर्थ नगर येथील युवक मंडळान मराठा मोर्चास पाठींबा दिला या साठी एका बैठकिच आयोजन करण्यात आल होत . मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कणेरी यांच्या अध्यक्षतेखाली शकडो मराठी भाशिकानी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला . यावेळी शहार समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील शिव प्रतिष्ठान चे किरण गावडे सुनील जधव उपस्थित होते .