बेळगाव दि १५ : बेळगाव शहरातील क्रांती मोर्चा इतका इतिहासिक होणार आहे कि गुरुवारी लग्न असलेल्या होणारे नवर देव आणि नवरी यांनी देखील हा मोर्चा चुकवायचा नाही आहे अस ठरवलं आहे .त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या मूक मोर्चात हे जोडप मुंडावळ्या सहभागी होणार आहे.
संजय रमेश गावडोजी राहणार कोरे गल्ली शहापूर अस या नवरदेवाच नाव असून वझे गल्ली वडगाव च्या मनीषा पांडुरंग धामणेकर या नवरी हे दोघे जन जोडी सह सहभागी होणार आहेत.सकाळी १० वाजता शिवाजी उद्यानात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हर अर्पण करून मोर्चात सहभागी होऊन ते विवाह स्थळाकडे रवाना होणार आहेत .