Thursday, April 25, 2024

/

बेळगाव महा पालिकेचा बजेट सादर : पुढील वर्षा साठी ३४ कोटींची तरतूद

 belgaum

बेळगाव दि ७ : बेळगाव महा पालिका अर्थ आणि कर स्थायी समिती अध्यक्ष रतन मासेकर यांनी यंदाचा पालिकेचा अर्थसंकल्पीय बजेट सदर केला .या वर्षीच्या बजेट मध्ये पालिकेचा उत्पन्न वाढविण्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत अनेक नवीन योजनाची घोषणा देखील करण्यात आली आहे . मासेकर यांनी एकूण वर्ष साठी ३४ कोटी बजेट सादर केला

पालिकेच उत्पन्न वाढविण्यासाठी कार्य क्षेत्रात येणाऱ्या सर्व स्वयं घोषित कर योजनेखाली येणाऱ्या सर्व संपत्तींचा नवीन सर्वे करण्याचा ठेका देऊन संगणकीय नोंद करण्याचा बजेट मध्ये  तरतूद करण्यात आली आहे .

जानेवारी २०१७ पर्यंत एका वर्षात २१ कोटी संपत्ती कर वसूल करण्यात आला असून पुढील वर्षी हा कर ३५ कोटी होईल कारण १५ टक्के संपत्ती कर वाढविण्यात आला आहे असा अंदाज देखील बजेट मध्ये मांडण्यात आला आहे . या शिवाय जाहिराती कर १ कोटी , शहर नारा नियोजन विभाग कडून ५ कोटी ,केबल लेयिंग ५ लाख , हेस्कोम डवेलोपमेंट  फीज ७ लाख , झोपड पट्टी  २. ५ लाख , इमारती परवानगी १ कोटी कर होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे .

 belgaum

महा पालिकेच्या बाजूला नवीन इमारत बांधण्यासाठी यंदाच्या बजेट मध्ये ५ कोटी तरतूद करण्यात आली आहे .एकाच ठिकाणी मार्केट आणि कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी १५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे फेरी वाल्यासाठी पालिकेच्या वतीने कायम स्वरूपी गाड्या घेऊन थांबण्यासाठी देखील १ कोटीची तरतूद ५० लाख सोलार लाईट साठी ,१० लाखरुपये प्रत्येक वार्ड बजेट , बस स्थानकावर निवारा उभारण्यासाठी १ कोटी , पर्यावरण पूरक म्हणून प्लास्टिक वापरन करणाऱ्या कुटुंबाला १ लाख रुपये बक्षीस देण्याची तरतूद  करण्यात आली आहे .

शहर व्याप्ती मधील खुल्या जागांची विक्री करून त्यावर २० कोटी रुपये जमा होतील याची तरतूद देखील बजेट मध्ये करण्यात आली आहे .

बजेट दिवशी झालेल्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षान चर्चा करून रीवेन्यू सेक्शन मधील गळत्या रोखण्यासाठी , शॉपिंग कोल्प्लेक्स मध्ये चुकीच्या पद्धतीन ज्या लीज धारकांना मुदत वाढ मिळाली आहे यावर चर्चा करण्यासाठी सोमवार किंवा मंगळवारी  खस बैठक घेण्यात येणार आहे .

city corporation, mayor , election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.