17.1 C
Belgaum
Sunday, January 29, 2023
 belgaum

बातम्या

बुडा मधील त्या घोटाळ्याची चौकशी : मंत्री कारजोळ

बेळगाव नगरविकास प्राधिकरणात (बुडा) झालेल्या दीडशे कोटी रुपयांच्या भूखंड वाटप घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती  जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. बेळगावात जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन समारंभात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना...

बेळगावातील तृणधान्य-सेंद्रिय मेळाव्याचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : पाश्‍चिमात्य देशांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण किडनीचा त्रास, मधुमेह, कर्करोग आदी आजारांनी त्रस्त आहोत. त्यामुळे तृणधान्ये आणि सेंद्रिय घरगुती अन्नाचे सेवन करून आरोग्याचे रक्षण करण्याचे आवाहन जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी विभाग...

धर्म. छत्रपती संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या तयारीला वेग

बेळगाव लाईव्ह : आम. अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून आणि बेळगाव मधील तमाम शिवसैनिकांच्या सहकार्यातून बेळगाव मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम आता पूर्णत्वास आले असून शनिवार दि. 28...

बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

बेळगाव लाईव्ह : जिल्हा क्रीडांगणावर आज बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री गोविद कारजोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवर आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणात बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, बेळगाव...

बेळगाव मध्ये पिंक बसचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह: गेल्या अनेक दिवसांपासून महिलांसाठी विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अनिल बेनके आणि परिवहन मंडळाकडे मागणी करण्यात आली होती. इनरव्हील क्लब त्याचप्रमाणे सौरभ सावंत, संतोष दरेकर, अवधूत तिडवेकर आदींच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. बेळगावमध्ये महिला...

उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून हुद्दार शपथबद्ध

राज्यातील दोघा जिल्हा न्यायाधीशांनी काल मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी न्यायाधीश रामचंद्र दत्तात्रय हुद्दार आणि व्यंकटेश नाईक थावरनाईक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ देवविली. सदर शपथविधी सोहळ्यास कर्नाटक...

कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गोंधळ

बेळगाव लाईव्ह : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक या गावातील ग्रामपंचायतीत आज भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गोंधळ झाला. ग्राम पंचायत सदस्या रेखा इंडीकर आणि ग्रामस्थ सुनील बांद्रे यांनी उर्वरित ३३ जणांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आज बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत वादावादी होऊन गोंधळ निर्माण...

बेळगाव मध्ये पुन्हा हिवसाळा! तालुक्यातील ‘या’ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

बेळगाव लाईव्ह : ऐन थंडीच्या मौसमात तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण अनुभवणाऱ्या बेळगावकरांना जानेवारी महिन्यातही पावसाचा अनुभव मिळाला आहे. मच्छे, हलगा, येळ्ळूर आदी भागात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी...

‘सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी’ पुरस्काराने जिल्हाधिकारी नितेश पाटील सन्मानित

बेळगाव लाईव्ह : भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 'सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी' पुरस्काराने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सन्मानित करण्यात आले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बेंगळुरू येथील सर पुट्टण्णा चेट्टी टाऊन हॉल येथे निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या तेराव्या...

सिमाभाग शिवसेनेत होणार मोठा भूकंप; महत्त्वाचे पदाधिकारी सोडणार पद

बेळगाव जिल्हा शिवसेनेची होणारी बदनामीला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे , उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांनी शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना सोडत असलो तरी आम्ही कुठल्याही...
- Advertisement -

Latest News

अमित शहांच्या वक्तव्यावर,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण*

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात म्हादाई पाण्यावरून केलेल्या वक्तव्या नंतर गोव्यात सर्वच स्तरातून भारतीय जनता...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !