Friday, December 5, 2025

/

हिपॅटायटीसवर करा मात, ‘अरिहंत’ची घ्या साथ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जागतिक हिपॅटायटीस दिन २८ जुलै रोजी साजरा केला जातो. यंदा डब्ल्यूएचओने यावर्षी हिपॅटायटीस: चला ते खंडित करुया अशी थीम ठेवली आहे. याचा उद्देश सांक्रमिक हिपॅटायटीस आणि यामुळे होणाऱ्या यकृताच्या गंभीर समस्या व कर्करोबद्दल जागरुकता वाढविणे आहे. हिपॅटायटीस हा गंभीर आजार असला तरी आपण दैनंदिन जीवनात बदल व सटिक उपचार घेतले तर यावरही मात करता येते. बेळगाव शहरातील अरिहंत हॉस्पिटलमधील डॉ. वरदराज गोकाक यांच्या नेतृत्त्वाखाली व डॉ. गणेश कोप्पद यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागाकडून हिपॅटायटीस रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत आहेत. तसेच अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे.

हिपेटायटीस आजार हा अनेक कारणांनी होऊ शकतो. मात्र अरिहंत हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनीयुक्त ग्रॅस्ट्रो विभाग कार्यरत असून येथे आजारावर योग्य व यशस्वी उपचार करण्यात येतात. डॉ. वरदराज गोकाक हे वरिष्ठ व अनुभवी गॅस्ट्रोएंट्रोलॉजीस्ट म्हणून सेवा बजावत असून त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करून नवजीवन दिले आहे. गॅस्ट्रोचा कोणता आजार असला तरी रुग्ण डॉ. वरदराज गोकाक यांनाच पसंदी देऊन त्यांच्याकडून उपचार करून घेतात. त्यांना डॉ. गणेश कोप्पद यांचीही मोलाची साथ मिळत असून तेही रुग्णांवर योग्य उपचार देण्यात सक्षम आहेत.

जागतिक हिपॅटायटीस दिन, दरवर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश व्हायरल हिपॅटायटीस, यकृताची जळजळ आणि त्यामुळे होणारे गंभीर यकृत रोग आणि यकृताचा कर्करोग याबद्दल जागरुकता वाढवणे आहे. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. बारुच ब्लमबर्ग यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. त्यांनी हिपॅटायटीस बीचा शोथ लावून त्याच्या निदानासाठी चाचणी आणि लस विकसित केली.

 belgaum

व्हायरल हिपॅटायटीस हा यकृताच्या ऊतीच्या विषाणूंमुळे होणारा संसर्ग आहे. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी आणि ई ही पाच मुख्य विषाणू आहेत. रोगाची तीव्रता आणि उपचार हिपॅटायटीसच्या प्रकारावर आणि व्यक्तीवर अवलंबून असतात. यामुळे कधीकधी सिरोसिस किंवा कर्करोगाचा धोका संभवतो. हिपॅटायटीस पिवळ्या त्वचेने (कावीळ), गडद लघवी, मळमळ, उलट्या आणि पोटदुखीच्या माध्यमातून दिसून येतो.

लक्षणे :

फ्लू सिंड्रोमसारखाच तीव्र थकवा

भूक न लागणे

अतिसार

कावीळ

त्वचा व डोळे पिवळे होणे

लघवीचा रंग (गडद लघवी)

मळमळ किंवा उलट्या

उपचार :

हिपेटायटीसची लागण झाल्यानंर योग्य उपचार आणि व्यवस्थापनासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच आपल्या जीवनशैलीत बदल करून हिपेटायटीसवर मात करणे शक्य आहे. यासाठी आपण त्यादृष्टीने बदल करण्याची आवश्यकता असून डॉक्टारांच्या सल्ल्यानुसार दैनंदिन जीवन जगणे अत्यावश्यक आहे

मद्यपान टाळावे

धुम्रपान करू नये

समतोल व पोषक आहार घ्यावा

नियमित तपासणी करून घ्यावी

लसीकरण करून घ्यावे

नियमित व्यायाम करावा

हिपॅटायटीस ए : सामान्यतः शरीर हिपॅटायटीस ए विषाणूविरुद्ध लढण्यास सक्षम असते. म्हणून या आजारासाठी विशेष वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसते. परंतु विश्रांती आणि समतोल आहार घेतल्यास तो आजार बरा होतो. ४ ते ६ आठवड्यांनंतर लक्षणे नाहीशी होतात.

हिपॅटायटीस बी : बहुतेक प्रकरणांमध्ये हिपॅटायटीस बी विषाणूचा संसर्ग आपोआप बरा होतो. कोणत्याही औषधोपचाराची आवश्यकता नसते. विश्रांती व पोषक आहार घेण्याची आवश्यकता असते. जेव्हा संसर्ग ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकतो. तेव्हा उपचाराची आवश्यकता असते. हिपॅटायटीस बी संसर्गावर विविध उपचारपद्धती असून औषचेही उपलब्ध आहेत. यामुळे औषधोपचारातून संसर्गावर मात करता येते.

हिपॅटायटीस सी : सामान्यतः अँटिव्हायरल औषधांनी उपचार केले जातात. ज्यामुळे संसर्ग बरा होते. गंभीर परिस्थितीमध्ये निरीक्षण करण्यात येते. तर जुनाट प्रकरणांमध्ये स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि गुंतागुंत टाळण्यासाठी औषधोपचार, यकृत कार्य चाचण्या आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते.

हिपॅटायटीस डी व सी : उपचारांमध्ये लक्षणांवर आधारित काळजी घेऊन अँटिव्हायरल औषधे यांचा समावेश असतो. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनात बदल करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असते. पोषक आहाराचे सेवन करावे. तसेच व्यवसनापासून दूर राहण्याची गरज असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.