बेळगाव लाईव्ह :रस्त्यावरून चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या एका चोरट्याला एपीएमसी पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नांव सोमेश लक्ष्मण शंभूचे (वय 37, रा. कंग्राळ गल्ली बेळगाव) असे आहे.
याप्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, प्रीती नार्वेकर ही महिला काल गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता एपीएमसी येथील किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी चालत जात असताना एका व्यक्तीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.
यासंदर्भात प्रीती यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून नागेश शंभूचे या संशयित आला ताब्यात घेतले आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडील 2,12,400 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.
सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई करून आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. मंगळसूत्र चोरी प्रकरणाचा त्वरेने छडा लावल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.


