*कच्छ पाटीदार समाजाच्या वतीने हा उपक्रम*

0
7
Kachh patidar
 belgaum

श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज बेळगाव यांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठांचा सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता. कच्छमध्ये गावातील वरिष्ठ जोडप्यांचा आणि नागरिकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे त्याला अनुसरून बेळगावात प्रथमच वरिष्ठ अशा 49 जोडप्यांचा सत्कार करण्याचा अनोखा आणि अनुकरणीय उपक्रम राबविण्यात आला.

याचवेळी समाजाच्या श्री उमा क्रेडिट सौहार्द सहकारी नि,ची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही घेण्यात आली शास्त्रीनगर येथील श्री पाटीदार भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात समाजातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या ज्येष्ठांबद्दल तरुण पिढीच्या मनात स्नेहभाव निर्माण करण्याचे उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाचे अनेकानी कौतुक केले या कार्यक्रमास उमा सोसायटीचे सभासद व भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

समाजाचे अध्यक्ष जेठाभाई पटेल, सरचिटणीस रतनशीभाई पटेल, सोसायटीचे अध्यक्ष बाबूभाई पटेल, व सर्व संचालक मंडळाची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलदेवी श्री उमियादेवीच्या फोटोचे पूजन करण्यात आले जवेरलाल पटेल यांनी अहवाल वाचन केले.Kachh patidar

समाजाचे अध्यक्ष .जेठाभाई पटेल, महामंत्री . रतनशीभाई पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले, . बाबूभाई पटेल यांनी 2021/22 साठी 25% लाभांश जाहीर केला. सूत्रसंचालन अश्विन पटेल यांनी केले.

त्यानंतर युवा मंडळातर्फे मातृ पितृ वंदनेचा कार्यक्रम झाला. ज्यामध्ये समाजाचे ज्येष्ठ नागरिक नानजीभाई आणि माताजी जेठीबाई यांची मुख्य यजमानपदी नियुक्ती झाली आणि महाराज विशाल जोशी यांच्या हस्ते शास्त्रोक्त विधीनुसार माता व वडील, यांचे पूजन त्यांचा मुलां आणि सूना ह्यांचा हस्ते करण्यात आले.

ह्या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. व युवा मंडळातर्फे ज्येष्ठांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. मातृ पितृ वंदना कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री हर्षा पटेल आणि मीनल पटेल यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.