ही शाळा ठरली बेळगावातील स्वच्छ विद्यालय

0
14
Clean school
 belgaum

शालेय वातावरण स्वच्छ व सुंदर हवे या उद्देशाने स्वच्छ विद्यालय पुरस्कार वितरण चे आयोजन केले आहे.त्यानुसार शालेय स्वच्छतेचे मोजमापन करून स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात येतो.

2021_22 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार बेळगाव जिल्ह्यातील शिंदोळी येथील पब्लिक स्कूल ला मिळाला आहे.

त्यानुसार शाळेची स्वच्छता वर्ग खोल्यांची स्वच्छता शाळेचा परिसर याबरोबरच शुद्ध पिण्याचे पाणी तसेच बाथरूम टॉयलेटची व्यवस्था याशिवाय हात धुण्यासाठी आवश्यक सामग्री याबाबत ची तपासणी करून शाळेचा शैक्षणिक दर्जा शिक्षक मुख्याध्यापक यांची अध्यापन करण्याची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती घेऊनसदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.Clean school

 belgaum

त्यानुसार स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 मध्ये बेळगाव पब्लिक स्कूल शिंदोलीला बेळगाव जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी गौरविण्यात आले आहे. 4 स्टार रेटिंगसह 82% गुणांसह शाळेला गौरव प्राप्त झाला आहे.

तिच्या मुख्याध्यापिका राजश्री रेवशेट्टी तसेच शिक्षक वृंद यांच्या प्रयत्नातून व शाळेचे संचालक यांच्या मार्गदर्शनाने सदर पुरस्कार प्राप्त झाला.

स्वच्छ भारतासाठी हे खरोखरच अनुकरणीय कार्य आणि अमूल्य योगदान असून शाळेचे संचालक डॉ.शिवकुमार रेवशेट्टी यांना पुरस्काराचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.