पावसाचा मारा सातत्याने वाढत चालल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होत आहे. हलगा या गावाजवळील मोठा तलाव असाच भरला होता.
या तलावाने धोक्याची पातळी गाठलेली आहे असे लक्षात येताच गावातील युवकांनी व नागरिकांनी तातडीने दाखल होऊन स्वतःच्या खर्चाने पंपसेट बसवून पाइप लाइन लावून या तलावातील पाणी उपसा करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे आता दोन फूट पाणी खाली गेली असून धोका टळला आहे .सरकारी मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न कौतुकाचे आहेत. सगळीकडेच प्रशासन पोहोचू शकत नाही अशा वेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन उपाय योजना राबवायला लागते याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे .उशीर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी दाखल होते त्यांनी प्लास्टिक पाईप दिल्या. ऐकूण पाणी आडवा पाणी जिरवा साठी तलाव वाचवण्याचा हा चांगला प्रयत्न आहे.




