Saturday, April 27, 2024

/

वरून राजाचे थैमान ….स्वतःच्या सुरक्षेसाठी काळजी घ्या: आयजीपी

 belgaum

संततधार पावसाने परिस्थिती अवघड बनत आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी नियम पाळा आणि काळजी घ्या असे आवाहन आयजीपी राघवेन्द्र सुहास यांनी केले आहे.पुणे बंगळूर महामार्गावर कर्नाटक हद्दीत यमगरणी आणि निपाणी येथे तसेच कोल्हापूर जिल्हा हद्दीत पाणी वाहात आहे. तसेच दरडी कोसळत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान बंद झाला आहे. पुढील 24 तास हीच परिस्थिती राहील. किंवा आणखी कालावधी वाढू शकतो.हुबळी, बंगळूर मार्गावरील बस व ट्रक बंद आहेत. यामुळे या रस्त्यावरून जाण्याचे धाडस कुणीही करू नका. नियम पाळा आणि धोका टाळा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Khanapur river

मलप्रभा नदीला महापूर…

 belgaum

इतिहासात पहिल्यांदाच इतका महापूर आला आहे सध्या मलप्रभा नदीने उच्च अशी पाणी पातळी गाठली असून त्वेषाने वाहत आहे आज मंगळवारीही पावसाची संततधार सुरूच असून पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.खानापूर तालुक्यातील सर्व गांवचा संपर्क तुटला आहे पहिल्याचांच गोवा रस्त्याच्या पुलावर चार फुट पाणी आले आहे खानापूर उपनगर पोलीस वसाहत पुर्ण पाण्यात गेली असून आमदार अंजली निंबाळकर याच्या घरला देखील पाण्याचा वेढा आहे.खानापूर तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे शहरातील भटगल्लीईचा शहराशी संपर्क तुटला येण्यासाठी बाहेर येण्यासाठी रस्ताच नसल्याने २५घरांचा संपर्क तुटला आहे खानापूर शहारत कर्फ्यु सदृश्य स्थिती आहे

Khanapur road

चोरला रोड बंद

चोरला रोड ब्लॉक झाला असून बेळगाव गोवा देखील संपर्क तुटला आहे चोरला घाटातील अति पावसाने दरड कोसळून माती रस्त्यावर आली आहे.

 

मार्कंडेय नदीचा रुद्रावतार

रेल्वे पोलीस स्थानकात शिरले गुडघाभर पाणी
संगणक आणि सिपीयू टेबलवर उंचावर ठेऊन पोलिसांनी रात्री काम केले. रात्रभर पाणी वाढत होते. शिवाजीनगर, पंजीबाबा, वीरभद्र नगर पहिली गल्ली, दुसरी गल्लीत दोन फूट हुन अधिक पाणी घुसले आहे.
वीरभद्र नगर आणि शिवाजी नगर बुडून जात आहे.

मार्कन्डेय नदी पाणी पात्रात बेसुमार वाढ. कंग्राळी खुर्द आणि अलतगा गावचा संपर्क तुटला आहे. कंग्राळीच्या पुलावर भरपूर पाणी आल्याने समस्या वाढली आहे. कंग्राळी खुर्द कडोली संपर्क तुटला आहे.
पुणे बंगळूर महामार्गावर पाणी वाढले आहे. बर्डे ढाबा, हत्तरगी पर्यंत पाणी वाढत आहे. पावसाने कहर केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक धोक्यात आली आहे.कुरबर गल्ली आणि व वडर गल्लीत पाणी शिरले आहे. येथील घरे पडण्याची शक्यता आहे. सध्या एक भिंत फोडून पाणी काढण्याची तयारी सुरू आहे. हे पाणी लवकरात लवकर काढले नाही तर धोका होऊ शकतो माजी नगरसेवक विनायक गुंजटकर घटनास्थळी दाखल झाले असून जे सी बी च्या साहाय्याने त्यांनी पाणी काढले आहे.

इंडाल ब्रिज आणि सांबरा अंडरपास येथे पाणी आले आहे वाहतूक करू नका असे ट्रॅफिक सिपीआय आर आर पाटील देखील केलं आहे.अपूर्वा हॉस्पिटल शास्त्रीनगर येथील परिस्थिती. रेडेकर यांच्या घरात शिरले पाणी घरातील वस्तू पैसे वाहून गेलेघरमालक आजारी आहे. त्याची पत्नी एकाकी पडली आहे. मदत करणाऱ्या पथकाची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.