बेळगाव बंगळुरू एअरबसला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

0
400
Air india service
 belgaum

बेळगाव विमान तळासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता कारण शुक्रवार पासून बेळगाव विमान तळावर प्रवाश्यांसाठी पहिल्यांदाच एअर इंडियाचे ३१९ मोठे विमान विमान लँडिंग झालं.विमान तळ धावपट्टीचे विस्तारिकरण झाल्यावर पहिल्यांदाच एअर इंडियाची मोठ्या विमानाची शासकीय विमानसेवा सुरू झाली आहे.

Air india service

बेळगाव विमानतळ प्राधिकरणाच्या वतीनं एअर इंडिया विमानाचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. बंगळुरू हुन बेळगाव कडे ४५ मिनिटाचा प्रवास करून बेळगाव विमान तळावर पोचताच शानदार वॉटर सॅल्यूट देण्यात आलं मोठया विमानाच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी या विमान सेवेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १२२ सीट पैकी बंगळूरहुन बेळगाव कडे 84  प्रवासी तर बेळगाव हुन बंगळुरू कडे १०४ जणांनी प्रवास केला पहिल्याच दिवशी विमानातील ८२ % जागा भरल्या.

 belgaum

Sambra air india
एअर इंडियाने आता लवकरच मुंबई, हैद्राबाद आणि चेन्नई या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. बेळगावचे उद्योजक आणि व्यापारी या विमानसेवांद्वारे आपला व्यवसाय मोठ्या शहरांकडे वळवू शकणार आहेत.खासदार ,प्रकाश हुक्केरी,पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.