belgaum

चार वर्षांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : एका निष्पाप चार वर्षांच्या चिमुकलीचे हास्य क्षणार्धात कायमचे हरपले… वडिलांच्या कुशीत सुरक्षित घरी पोहोचण्याआधीच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावाजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात वडील, त्यांची चार वर्षांची मुलगी आणि त्यांचा मित्र अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांची ओळख सैफ मुल्ला (२९), त्यांची चार वर्षांची मुलगी सिजा मुल्ला (४) आणि इम्तियाज बडगाव (३५) अशी झाली आहे. या अपघातात जिहान शारुख कुडचिकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिडकलहून गोकाककडे जाणारी खासगी बस आणि पोरबस शाळेकडून कोन्नूरच्या दिशेने जाणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीवरील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 belgaum

अपघातानंतर बसचालक वाहन जागीच सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, फरार बसचालकाचा शोध सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.