belgaum

SIR 41.7 लाखांपैकी 35.88 लाख मतदारांचा सहभाग

0
Roshan mohammad dc
 belgaum

बेळगाव लाईव्ह: जिल्ह्यात सुरू असलेली विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, एकूण 41.7 लाख मतदारांपैकी 35.88 लाख मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात आतापर्यंत 88 टक्के अर्ज परत प्राप्त झाले आहेत. पडताळणीदरम्यान 5.13 लाख मतदार अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत असल्याचे आढळून आले आहे. त्यांची यादी सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली असून, त्यामध्ये काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या 4,455 अर्जांचे डिजिटल रूपांतरण करण्याचे काम प्रलंबित असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत.

 belgaum

मतदार माहितीच्या मॅपिंग प्रक्रियेत काही त्रुटी आढळून आल्याने, मतदारांच्या नावांमधील चुका दुरुस्त करण्याबाबत बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

एसआयआर प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काटेकोर पडताळणी सुरू असून, राजकीय पक्षांच्या हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.