belgaum

सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणारा रेकॉर्डवरील गुंड ताब्यात

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सरकारी अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडाला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे.

न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतरही तो पोलिसांना चकवा देत फरार होता. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवानंद कोलकार असे असून, तो बैलहोंगल परिसरात नागरिकांना दमदाटी करणे, दादागिरी करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार होती. त्याच्याविरोधात यापूर्वीही विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 belgaum

न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतरही आरोपी काही दिवसांपासून फरार होता. मात्र, त्याच्या हालचालींबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.