बेळगाव लाईव्ह :आर्थिक व्यवहारातून दोन गटांमध्ये प्राणघातक शस्त्रांनी हाणामारी झाल्याच्या गोकाक (ता. जि. बेळगाव) शहरातील लक्ष्मी बडावणे येथील थरारक घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
कर्जाऊ दिलेल्या पैशाची विचारणा केल्यावरून लक्ष्मी बडावणे येथे दोन गटात वादावादीला प्रारंभ होऊन त्याचे पर्यवसान दोन्ही गटातील लोकांनी हातात लोखंडी रोड घेऊन परस्परांवर हल्ला चढवण्यामध्ये झाल्याचे समजते.
या हाणामारीची थरारक दृश्य शेजाऱ्यांनी व्हिडिओमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केली असून तो चर्चेचा विषय झाला आहे. लोखंडी रॉडने केलेल्या अमानुष मारहाणीत वरूण संतोष गोल्लर (वय 16) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

हाणामारीची माहिती मिळताच गोकाक शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन चौकशीला सुरुवात केली आहे. सदर घटनेची गोकाक शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.




