belgaum

अज्ञातांकडून मुडलगी येथे युवकाचा भोसकून खून

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यामध्ये एक युवक ठार झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथील वड्डर गल्ली येथे काल शनिवारी रात्री घडली.

वयात युवकाचे नाव लक्ष्मण बंडीवड्डर (वय 22, रा. वड्डर गल्ली, मुडलगी) असे आहे. विजयपूर जिल्ह्यातील टक्कळकी येथे कामाला असलेला लक्ष्मण अलीकडेच 18 मे रोजी गावी परतला होता. काल शनिवारी मध्यरात्री अज्ञात तरुणांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला चाकूने भोसकले.

त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या लक्ष्मण याने तशा गंभीर जखमी अवस्थेतही घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. तेंव्हा नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन लक्ष्मण याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तथापी अतिरक्तस्त्रामुळे उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला.

 belgaum

लक्ष्मण बंडीवड्डर यांच्या खुनाचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी प्रेमप्रकरणातून त्याला मारण्यात आल्याचा कयास आहे. एक उत्तम कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मण हा क्रांतिवीर भगतसिंग यांचा कट्टर चाहता होता.

अलीकडेच गावामध्ये त्याने भगतसिंग युवक संघाची स्थापना देखील केली होती. त्याच्या खून प्रकरणी मूडलगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी विशेष पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.