Home बातम्या गांजा सेवन प्रकरणी तिघांना अटक
belgaum

गांजा सेवन प्रकरणी तिघांना अटक

0
गांजा सेवन प्रकरणी तिघांना अटक
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून, सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

पहिली कारवाई उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील एसबीआय बँकेजवळ करण्यात आली. या ठिकाणी संशयास्पद आणि विचित्र वर्तन करणाऱ्या अनंत मारुती लोहार (वय २३, रा. शहापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय किरण होनकट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली असता, त्याने मादक पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

दुसऱ्या घटनेत, उद्यमबाग येथील सुभाषचंद्र गार्डन जवळ सुखोश दीपक हळदणकर (वय २४, रा. स्वामीनाथ कॉलनी) हा तरुण अमली पदार्थांच्या नशेत आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाचणी केली असता त्यानेही गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही तरुणांवर उद्यमबाग पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

तिसरी कारवाई हिरेबागेवाडी परिसरात करण्यात आली. येथील सरकारी रुग्णालयाजवळ निकित बसवराज हंपन्नवर (वय २४, रा. संभाजी गल्ली, बस्तवाड) हा तरुण अमली पदार्थाच्या नशेत असताना पकडला गेला.

पीएसआय अविनाश वाय. आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.