belgaum

एक लाख सह्यांच्या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

0
184
 belgaum

बेळगांव : सीमाप्रश्नाच्या प्रलंबित दाव्याची सर्वोच्च न्यायालयात त्वरित व सलग सुनावणी व्हावी, या मागणीसाठी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सुरू करण्यात आलेल्या एक लाख सह्यांच्या मोहिमेला सीमाभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या मोहिमेचा प्रारंभ गुरुवारी चव्हाट गल्ली परिसरात करण्यात आला. पहिल्या सीमा सत्याग्रही अमृतराव हसबे यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंदा हसबे यांनी पहिली सही करून मोहिमेची सुरुवात केली.

इतिहासाची साक्ष देताना, १९५६ साली जयंतराव टिळक यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीसिंह नाना पाटील चौकात झालेल्या सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत अमृतराव हसबे सहभागी झाले होते.

 belgaum

त्यावेळी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तसेच, त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई रामराव हसबे यांनीही महिला सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत सहभागी होऊन तुरुंगवास भोगला होता.

सह्या संकलन मोहिमेच्या प्रारंभावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मोहिमेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, पुढील काही दिवसांत ही चळवळ अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.