बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे (केएससीए) धारवाड, बेळगाव, कारवार, गदग आणि हुबळी या जिल्ह्यांच्या 14, 16 व 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघासाठी येत्या गुरुवार दि. 26 मार्च ते शनिवार दि. 4 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये खुल्या निवड चांचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर निवड चांचणीसाठी 14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात भाग घेणारा खेळाडू 1 सप्टेंबर 2012 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीत जन्मलेला असावा. त्याचप्रमाणे 16 वर्षाखालील मुलांच्या गटात भाग घेणारा खेळाडू 1 सप्टेंबर 2010 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत तर, 19 वर्षाखालील मुलांच्या गटात भाग घेणारा खेळाडू 1 सप्टेंबर 2007 ते 31 ऑगस्ट 2010 या कालावधीत जन्मलेला असावा. जर तीनही गटांच्या निवड चाचणीचे वेळापत्रक (अनुक्रमे जिल्हा, तारीख, दिवस, वेळ, स्थळ यानुसार) पुढील प्रमाणे असेल. 14 वर्षाखालील वयोगट : गदग -29/03/2026, रविवार, सकाळी 8 वाजता, के एच पाटील एस्ट्रो टर्फ गदग. कारवार -29/03/2026, रविवार सकाळी 8 वाजता, महादेवी मैदान कारवार. बेळगाव -03/04/2026 शुक्रवार, सकाळी 8 वाजता, केएससीए बेळगाव. हुबळी -31/03/2026, मंगळवार, सकाळी 8 वाजता, केएससीए हुबळी. धारवाड -31/03/2026, मंगळवार, सकाळी 8 वाजता, के. ई. बोर्ड स्कूल मालमड्डी धारवाड. या 14 वर्षाखालील गटाचे आंतर जिल्हा सामने दि. 6 ते दि. 10 एप्रिल 2026 या कालावधीत खेळवले जातील.
16 वर्षाखालील वयोगट : गदग -29/03/2026, रविवार, सकाळी 10:30 वाजता, के एच पाटील एस्ट्रो टर्फ गदग. कारवार -29/03/2026, रविवार सकाळी 10:30 वाजता, महादेवी मैदान कारवार. बेळगाव -03/04/2026 शुक्रवार, सकाळी 11:30 वाजता, केएससीए बेळगाव. हुबळी -31/03/2026, मंगळवार, सकाळी 11:30 वाजता, केएससीए हुबळी. धारवाड -31/03/2026, मंगळवार, सकाळी 11:30 वाजता, के. ई. बोर्ड स्कूल मालमड्डी धारवाड. या 16 वर्षाखालील गटाचे आंतर जिल्हा सामने दि. 12 ते दि. 16 एप्रिल 2026 या कालावधीत खेळवले जातील.
19 वर्षाखालील वयोगट : हुबळी -26/03/2026, गुरुवार, सकाळी 8 वाजता, केएससीए हुबळी. धारवाड -26/03/2026, गुरुवार, दुपारी 12 वाजता, केएससीए हुबळी. बेळगाव -26/03/2026 शुक्रवार, सकाळी 8:30 वाजता, केएससीए बेळगाव. गदग -29/03/2026, रविवार, दुपारी 12:30 वाजता, के एच पाटील एस्ट्रो टर्फ गदग. कारवार -29/03/2026, रविवार दुपारी 12:30 वाजता, महादेवी मैदान कारवार. या 19 वर्षाखालील गटाचे आंतर जिल्हा सामने दि. 31 मार्च ते दि. 4 एप्रिल 2026 या कालावधीत खेळवले जाणार असून या गटाच्या निवड चांचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी सोबत स्वतःचा मूळ जन्म दाखला आणि आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. तरी सदर निवड चांचणीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी धारवाड -वसंत मुर्डेश्वर (9448119586), बेळगाव -बाळकृष्ण पाटील (8660896963), कारवार -गौतम नेतलकर (9980996166), गदग -एस. एल. गुळेदगुड (9448760129), हुबळी -टोनी झळकी (9880921222) अथवा केएससीए धारवाड विभाग कार्यालय 0836 -3508842 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केएससीए धारवाड विभागाचे वीरान्ना सवदी यांनी केले आहे





