belgaum

आम. असिफ सेठ यांच्याकडून यूजीडीची दुरुस्ती पूर्ण

0
334
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मतदारसंघातील जनतेच्या तक्रारींची दखल घेत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भांदूर गल्ली परिसरातील रहिवाशांची अनेक वर्षांची समस्या मार्गी लावली आहे. महिलांच्या मागणीनुसार मूलभूत सुविधांचे काम पूर्ण केल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

बेळगाव उत्तर मतदारसंघातील भांदूर गल्ली, फूलबाग गल्ली आणि ताशिलदार गल्लीतील रहिवासी गेल्या अनेक काळापासून सांडपाण्याच्या समस्येने त्रस्त होते. साधारण दीड महिन्यांपूर्वी जेव्हा आसिफ सेठ या भागात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी आले होते, तेव्हा स्थानिक महिलांनी रस्ता बनवण्यापूर्वी भूमिगत गटार (यूजीडी) वाहिनीची दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी केली होती.

जनतेची अडचण ओळखून आमदारांनी त्याच वेळी रस्त्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. आधी सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार आता यूजीडीचे काम पूर्ण झाले असून, त्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची जोडणीही करण्यात आली आहे. या कामांनंतर आता पुन्हा रस्ते डांबरीकरणाच्या कामाला वेग आला असून फूलबाग गल्ली येथे या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

 belgaum

आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गल्लीत मूलभूत सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, असे आसिफ सेठ यांनी म्हटले. “दिलेला शब्द पाळत आमदारांनी आधी आमची सांडपाण्याची समस्या सोडवली आणि आता रस्ताही होत आहे,” अशी भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली.

या प्रसंगी इंद्रजित पाटील, अमान सेठ, लता माने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.