belgaum

मच्छेत संगोळी रायण्णा पुतळ्यावर पदार्थ; पोलिसांचा तपास सुरू

0
1157
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहराजवळील मच्छे गावात क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी कोणता तरी पदार्थ टाकल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संबंधित ठिकाणाहून त्या पदार्थाचे नमुने जप्त करण्यात आले असून न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकानेही घटनास्थळी भेट देत सखोल तपासणी केली आहे.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा असून पुतळ्यापासून सुमारे १० मीटर अंतरावरील कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. तो पदार्थ नेमका कसा आणि कोणाकडून टाकण्यात आला, याचा शोध तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतला जात आहे.

 belgaum

या प्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नसून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान पुतळा परिसरात असलेल्या त्या झाडावरून कोणता पदार्थ पडत आहे का याचा देखील तपास केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.