belgaum

५९३ कोटींचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघड

0
528
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेंगळुरूमध्ये बनावट इन्पुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यासाठी ५९३ कोटी रुपयांची बनावट बिले तयार करणाऱ्या टोळीचा जीएसटी इंटेलिजन्सच्या बेळगाव झोनल युनिटने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून २३५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (DGGI) बेळगाव युनिटने एका संशयास्पद नोंदणीचा तपास केला असता बेंगळुरूमधील ‘मेसर्स स्टार टॅक्स कन्सल्टंट’शी संबंधित परिसरांवर छापे टाकले. या कारवाईत प्रत्यक्षात कोणताही माल किंवा सेवांचा पुरवठा न करता केवळ बनावट बिले जारी करून २३५ कोटींचा ‘आयटीसी’ लाटण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले.

आरोपीने अनेक बोगस कंपन्यांच्या नावावर नोंदणी करून केवळ बिले आणि ई-वे बिले तयार करण्यासाठी ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर केला होता.

या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला नोंदणीकृत जीएसटी प्रॅक्टिशनर मोहम्मद सैफुल्ला याला बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आली. तो अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावावर जीएसटी क्रमांक मिळवून कमिशनच्या बदल्यात बनावट बिले विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, बेंगळुरू येथील आर्थिक गुन्हे न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला बेळगावला आणण्यात आले. बेळगाव येथील जेएमएफसी-४ न्यायालयाने मोहम्मद सैफुल्ला याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या घोटाळ्यातील इतर लाभार्थींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती बेळगाव झोनल युनिटने दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.