belgaum

शांताई विद्या आधार फाउंडेशनकडून दोन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

0
510
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शांताई विद्या आधार फाउंडेशनतर्फे शहरातील ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या दोन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी धनादेशाच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्याचा छोटा कार्यक्रम आज बुधवारी पार पडला.

रॉय रोड, टिळकवाडी येथील शांताई विद्या आधार कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी विजय पाटील, चंद्रकांत बोगार, विनायक बोंगळे, ॲलन विजय मोरे, विश्वास पाटील यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संबंधित दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना औपचारिकपणे आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना विजय पाटील यांनी विद्या आधार ही एक अशी संस्था आहे, ज्याद्वारे आतापर्यंत 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली आहे अशी माहिती देऊन शहरातील नागरिकांसह शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांना त्यांच्याकडील जुनी वर्तमानपत्रे विद्या आधारला दान करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 belgaum

अशा योगदानामुळे संस्थेला आपले कल्याणकारी कार्य सुरू ठेवण्यास आणि अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते, असेही ते म्हणाले. आजच्या आर्थिक मदतीच्या उपक्रमामुळे बेळगाव भागातील शिक्षण प्रसारासाठी आणि वंचित पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्या आधारची असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.