बेळगाव लाईव्ह | महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने युवा नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली रायगड येथे निघणाऱ्या ‘मराठी सन्मान यात्रेत’ येळ्ळूर गावातील शेकडो कार्यकर्ते व वारकरी भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. या यात्रेला पाठिंबा जाहीर करण्यासाठी लक्ष्मी गल्लीतील दत्त मंदिर येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीपूर्वी महाराष्ट्र चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते श्री. वामनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवहिंद चेअरमन शिवाजी सायनेकर, अभियंता हणमंत कुगजी व प्रशांत मजुकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.
युवा नेते शुभम शेळके यांनी मार्गदर्शन करताना,
“येळ्ळूर गाव नेहमीच सीमालढ्याचा अग्रभागी राहिले आहे. आजही शेकडो कार्यकर्त्यांनी ‘मराठी सन्मान यात्रेत’ सहभाग दर्शवून आपली निष्ठा दाखवून दिली आहे. येळ्ळूरने दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असे ठामपणे सांगितले.

बैठकीत दुद्दापा बागेवाडी यांनी युवकांनी सीमालढ्यात सक्रिय सहभाग घेऊन चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. तर प्रकाश अष्टेकर यांनी येळ्ळूरने ज्येष्ठांप्रमाणेच युवा चळवळीच्या पाठीशीही ठाम उभे राहिल्याचे नमूद केले.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा तेवत ठेवेल, असे आश्वासन देत देणगीदारांचे आभार मानले. अमोल जाधव, गणेश अष्टेकर, श्रीकांत नांदूरकर आदींनीही मनोगत व्यक्त केले.
-
मराठा समाजाचे भवितव्य कुठे?शिक्षण, श्रम अन् बुद्धीची गरज!

बेळगाव लाईव्ह विशेष :गणेशोत्सव संपला, मिरवणुका संपल्या, ढोल-ताशांचा आवाज थांबला. मात्र या उत्सवानंतर एक गंभीर प्रश्न समाजासमोर उभा राहतो—आपली सामूहिक ऊर्जा आपण नेमकी कुठे खर्च करतो आहोत? गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका संवादात ‘मराठावादी असणे’ या विषयावर सविस्तर चर्चा झाली. मराठा समाजाची सद्यस्थिती, तरुण पिढी, शिक्षण, श्रमसंस्कृती, संघटन आणि सामाजिक नेतृत्व यावर व्यक्त करण्यात आलेली…
-
बेळगावची विसर्जन मिरवणूक : भक्ती कमी अन् स्पर्धा जास्त?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रानंतर अत्यंत नावाजलेली बेळगाव शहराची गणेश विसर्जन मिरवणूक गेल्या काही वर्षांपासून भक्तीपेक्षा स्पर्धा आणि नियोजनाच्या अभावामुळेच अधिक चर्चेत येत आहे. सलग २४ तास, ३६ तास आणि यंदा तर तब्बल ४० ते ४८ तासांपर्यंत ताणली गेलेली ही मिरवणूक नेमकी कोणासाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य बेळगावकर विचारू लागले आहेत. यंदा २५ सप्टेंबर रोजी…
-
पोलिसांच्या कर्तव्याची कसोटी!थकवा चेहऱ्यावर, कर्तव्य मात्र अविरत…!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात श्री गणेशाला निरोप देण्यासाठी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक यंदा लांबत जाऊन तब्बल ३६ ते ४८ तासांपर्यंत चालली. या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण उत्सवाचा उत्साह कायम असताना, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल आणि शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याची मोठी कसोटी लागली. सलग तीन दिवस रस्त्यावर ठिय्या मांडून अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने बंदोबस्त…
या मराठी सन्मान यात्रेला येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन, हिंदवी स्वराज्य युवा संघटना, वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, छत्रपती विराट गड संवर्धन पथक, छत्रपती विराट हलगी पथक, शेतकरी कामगार गणेशोत्सव (कलमेश्वर गल्ली), शिवसेना (विराट गल्ली), गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुर्गा माता मंडळ आणि उषानारायण फाउंडेशन यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
यात्रेसाठी आर्थिक व साहित्य स्वरूपात मोठा हातभार लावण्यात आला. नितेश फकिरा काकतकर यांनी २५ हजार रुपये, श्रीकांत शिवाजी नांदूरकर यांनी १० हजार रुपये (२ क्विंटल तांदूळ), सुनील वामनराव पाटील १० हजार, हणमंत लु. कुगजी ५,०५१, अमित य. पाटील ५,०००, परशराम निंगापा धामणेकर ५,०००, बाळासाहेब पावले ५,०००, हिंदवी स्वराज्य संघटना ५,०००, प्रभाकर मंगणाईक २,५०० तर कलमेश्वर गल्ली कामगार संघटनेनेही देणगी दिली.
श्रीचांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे प्रसाद यल्लोजी मजुकर यांनी २० बॉक्स पाण्याच्या बाटल्यांची देणगी दिली. तसेच मिलिंद अष्टेकर, महेश कुगजी, ऋषी मजुकर व प्रवीण मजुकर यांनी वैद्यकीय किट्स उपलब्ध करून दिले.
या कार्यक्रमाला उदय जाधव, राजू पावले, प्रकाश पाटील, सुरज गोरल, अनिल हुंदरे, गोविंद बापूसाहेब पाटील, रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिंटू चौगुले, यल्लापा पाटील, सतीश देसुरकर, मनोज कुगजी, विनोद लोहार, संकल्प जाधव, सागर नायकोजी, ओमकार पाटील, सुमंत कुगजी, योगेश कदम, राहुल कुगजी, प्रवीण मुचंडी, भावू हलगेकर, किरण उडकेकर, गजानन कुंडेकर, अवधूत लोहार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते दत्ता उघाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानण्यात आले.





