बेळगाव लाईव्ह :तारा नगर, पिरनवाडी, तालुका बेळगांव – अति वेगाने आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोपी ट्रक चालकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
बेळगांव येथील २ रे जे. एम. एफ. सी. न्यायालयाच्या न्यायाधिशांनी साक्षीदारांतील विसंगती लक्षात घेऊन आरोपीची मुक्तता दिली.
आरोपी: जोतीबा मधू पाटील, वय ४० वर्षे, राहणार लक्ष्मी गल्ली, अनगोळ, ता. व जि. बेळगांव तर. फिर्यादी: श्रीमती ज्योती शहाजी शिरके, राहणार मच्छे, ता. व जि. बेळगांव अशी दोघांचीही नावे आहेत.
बेळगांव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरनवाडी गावातील तारा नगर रस्त्यावर, सिध्दणगौंड पाटील यांच्या घरासमोर, दिनांक २५-०९-२०१६ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घटना घडली. आरोपी ट्रक चालक जोतीबा मधू पाटील त्याचा ट्रक (नं. के. ए. २२ बी-६३५२) अति वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता.
त्याचवेळी फिर्यादीचे पती, शहाजी निरसोजी शिरके (वय ५२), हे मच्छे कडून दरगाकडे जात असताना आपली होनडा अक्टीवा (नं. के. ए. २२ ई. जे. २९०३) चालवत होते. त्यावेळी ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराने धडक दिली, ज्यामुळे शहाजी शिर्के ट्रकच्या खाली आले आणि गंभीर जखमी झाले. त्यांनी घटनास्थळी मृत्यू पावला.
घटना समजताच फिर्यादी ज्योती शहाजी शिर्के यांनी बेळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी ट्रक चालकाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आणि भा.द.वी. कलम २७९, ३०४ (अ) नुसार दोषारोप दाखल केला.
न्यायालयात प्रत्यक्ष साक्षीदार व मुद्देमाल तपासण्यात आले. परंतु साक्षीदारांतील विसंगतींमुळे न्यायालयाने आरोपी ट्रक चालक जोतीबा मधू पाटीलला निर्दोष मुक्तता दिली.
आरोपीकडून अॅड. मारुती कामाणाचे यांनी काम पाहिले.



