belgaum

19 महिने झाले तरी दोषारोप पत्र झाल नाही दाखल

0
22
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावातील एका गल्लीमध्ये एकच योजना तीन वेळा राबविल्याचे दाखवून बनावट कागदपत्राद्वारे योजनेचे अनुदान हडप केल्याचे प्रकरण माहिती हक्क अधिकाराखाली उघडकीस आल्यामुळे गावकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

बाळेकुंद्री खुर्द गावातील एका गल्लीमध्ये एकच योजना तीन वेळा राबविल्याचे आणि त्यासाठी कागदोपत्री तीन वेळा वेगवेगळी नावे दाखवून योजनेचा निधी हडप करण्यात आल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणी जून 2023 मध्ये पोलिसात एफआयआर अर्थात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

तथापि आता 19 महिने उलटले तरी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 belgaum

बाळेकुंद्री खुर्द गावातील आंबेडकर गल्लीतील पाईपलाईन घालण्याच्या कामांसाठी विविध योजनेअंतर्गत 10 लाख आणि 1 लाख 21 हजार 161 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र ज्या दोन घरांदरम्यानच्या अंतरामध्ये पाईपलाईन घालण्याचे काम दाखवण्यात आले आहे, ती सिद्धाप्पा करेन्नवर आणि यल्लाप्पा जोगानी यांची घरे मुळात आंबेडकर गल्लीमध्ये अस्तित्वातच नाहीत.

या पद्धतीने बनावट कागदपत्रांद्वारे नावे बदलून एकाच ठिकाणी एकच योजना तीन वेळा राबवल्याचे दाखवून तीन वेळा अनुदान उकळण्यात आले असल्याचा आरोप आंबेडकर गल्लीतील रहिवासी मल्लेशी रामचन्नावर यांनी केला आहे. तसेच या संदर्भात त्यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार केली असून ही लेखी तक्रार राज्यात चर्चेचा विषय झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.