बेळगाव लाईव्ह : घरबसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवून शेकडो महिलांची तसेच काही ऑटोचालकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अगरबत्ती पॅकिंगचे काम देतो असे सांगून प्रत्येकाकडून पैसे आकारून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे’.
घटनेचा तपशील :
बी.एम. ग्रुप महिला गृहोद्योग समूह या नावाने गृहोद्योग चालवला जात असल्याचे भासवून महिलांकडून प्रत्यक्ष काम देण्यापूर्वी 2,500 रुपये घेतले जात होते. काम केल्यानंतर 3,000 रुपये मजुरी देऊ असे आश्वासन देण्यात येत होते. मात्र पैसे घेतल्यानंतर न काम देण्यात आले, न पैसे परत केले. त्यामुळे महिलांची आर्थिक फसवणूक झाली.
या फसवणुकीविरोधात शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच पोलिस आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले होते. मागील आठवड्यात खासबाग येथील साई भवनमध्ये झालेल्या बैठकीत महिलांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला होता.
फिर्याद आणि अटक :
लक्ष्मी आनंद कांबळे, रा. पाटील गल्ली, खासबाग यांनी 25 ऑक्टोबर 2025 रोजी शाहापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला. तपासादरम्यान आरोपीचे नाव
बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (वय 35)
रा. जाळोळी, ता. पंढरपूर, सध्या पुऱसंघी, पुणे
असे समोर आले.
शहापूर पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
तपास पथक :
पीएसआय मणिकंठ पुजारी, श्रीमती एस. एन. बसवा (तपास), मनोज भजंत्री (सीसीबी), तसेच कर्मचारी एस. एम. गुडडाईगोल, श्रीधर तळवार, अजीत शिपूरे आणि तांत्रिक पथकातील रमेश अक्की यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.या पथकाच्या कार्याचे बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी कौतुक केले आहे.



