बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पंचायत शिक्षण खात्याच्या अंतर्गत आणि शाळा शिक्षण उपसंचालक कार्यालय बेळगाव यांच्या मार्फत बेळगावात राज्यस्तरीय जुडोस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जुडो स्पर्धा 25 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत बेळगावातील शिवबसव नगर येथे असलेल्या सिद्धरामेश्वर हायस्कूल हॉलमध्ये पार पडणार आहे.
या स्पर्धेत 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुलगे व मुली सहभागी होणार असून, संपूर्ण कर्नाटक राज्यातील 25 पेक्षा अधिक जिल्ह्यांमधून 600 हून अधिक जुडोका या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
25 ऑक्टोबर रोजी रिपोर्टिंग व वजन काटा (Weigh-in) प्रक्रिया पार पडेल. 26 ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन समारंभ व सामने सुरू होतील, आणि 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत सामने सुरू राहतील.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते खेळाडू कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व राजस्थान व मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील जुडो स्पर्धांमध्ये करणार आहेत.
या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 20 अधिकारी सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा राज्य पुरस्कार प्राप्त अंतर्गत जुडो प्रशिक्षक श्रीमती कुतुजा मुलतानी आणि कु. रोहिणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.










