बेळगाव लाईव्ह : शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली आहे. मंगळवारी रात्री बेळगुंदी गावात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव करण पाटील वय 34 कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे आहे.
याबाबत समजलेला अधिक माहितीनुसार करण हा पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये कामाला होता वर्कब्राम होम मध्ये तो आपल्या गावी आला होता.
त्यावेळी मंगळवारी घरा समोरील शेतात रात्री त्याला साप चावला होता लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काही उपयोग झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
शेतकरी कुटुंबातील पुणे येथे नोकरी करणारा युवक दगावल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.



