बेळगाव लाईव्ह | माळमारुती पोलीस ठाण्याच्या पथकाने बेळगावातील खून प्रकरणातील आरोपीला अटक केली असून, चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तक्रारदार बसवराज महादेव जोगी (रा. कार्लकट्टी, ता. सवदत्ती, जि. बेळगाव. ह.मु. साई मंदिराजवळ, श्रीनगर, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील महादेव भीमप्पा जोगी (वय 58 वर्षे), जे सिक्युरिटीचे काम करत होते, यांचा 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत शिवबसवनगर येथील SGBIT कॉलेजसमोर असलेल्या क्वार्टर्समध्ये धारदार हत्याराने खून करण्यात आला होता.
या घटनेनंतर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 194/2025 भा.न.सु.स. कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासादरम्यान एसीपी (मार्केट उपविभाग) संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व माळमारुती पोलीस ठाण्याच्या पथकाने** संशयित आरोपीचा शोध घेऊन दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी अटक केली.
चौकशीत आरोपीने दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून धारदार चाकूने वार करून खून केल्याची कबुली दिली. आरोपी आकाश ईरप्पा निप्पाणिकर (वय 28 वर्षे, रा. आंबेडकर गार्डन मागे, बेळगाव) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.




